नाशिककरांनो, बस पकडण्याआधी हे जाणून घ्या! एसटीच्या स्थानकांचे नवे नियोजन
नाशिककरांनो, बस पकडण्याआधी हे जाणून घ्या! एसटीच्या स्थानकांचे नवे नियोजन
img
Nandini khandare More
रस्त्यांचे खोदकाम, वाहतुकीतील बदल आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी यामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या बदलाच्या टप्प्यात आहे. याचा थेट परिणाम एसटी बससेवेवर होत असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक विभागाने बसस्थानकनिहाय नवे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, मालेगाव, धुळे यांसह विविध मार्गांच्या बस आता ठराविक स्थानकांवरून धावणार आहेत.

शहरात रस्त्यांच्या खोदकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठक्कर बाजार, महामार्ग बस स्थानक आणि मेळा या प्रमुख बस स्थानकांतून सुटणाऱ्या बससेवेचे वर्गीकरण करण्यात आले. या प्रमुख बस स्थानकांवरील बोजा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बससेवा पंचवटीतील निमाणी या शहर बससेवेसाठी असलेल्या स्थानकाकडे वळविण्यात आली. 

म्हणजेच निमाणी बस स्थानकातून बससेवेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सुरत, धुळे, सटाणा, मालेगाव, नंदुरबार, शहादा, सप्तश्रृंगी गड, दिंडोरी या भागाकडे जाणाऱ्या बसेस निमाणी बस स्थानकातून सोडण्यात येऊ लागल्या.

काही महिन्यांपासून करण्यात आलेल्या या बदलामुळे निमाणी बस स्थानकातील भार अचानक वाढला. आधीच या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आणि अरुंद रस्ते असल्याने सतत वाहतूक कोंडी होत असताना बससेवेच्या नवीन बदलामुळे कोंडीत अधिकच भर पडली. निमाणी परिसरात कायमच वाहतूक कोंडी होऊ लागली. शिवाय, पश्चिम नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि पूर्वेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल अधिक त्रासदायक ठरला. रिक्षा, शहर बससेवेतून त्यांना निमाणीपर्यंत येणे भाग पडल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडू लागला. शिवाय निमाणी बस स्थानकात उतरुन अंबड, सिडको, सातपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचाही खर्च वाढला. परंतु,आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर राज्य परिवहन मामंडळाच्या नाशिक विभागाने पर्वीच्याच स्थानकांतनसातपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचाही खर्च वाढला. परंतु, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने पर्वीच्याच   बस स्थानकांतून सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. 


नवीन बदल

यासंदर्भातील नवीन वेळापत्रकानुसार काही प्रमुख मार्गावरील बसेस कोणत्या स्थानकांतून सुटणार, ते पुढीलप्रमाणे – मेळा बस स्थानक- पुणे, जळगाव, धुळे, मालेगाव, येवला, मनमाड, कोल्हापूर.

नवीन बस स्थानक (ठक्कर बाजार) – त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सप्तश्रृंगीगड, पेठ, सुरगाणा, कळवण

महामार्ग बस स्थानक (मुंबई नाका) - मुंबई, सुरत, शिर्डी, अहिल्यानगर, बलसाड प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group