आता नाशिकची बारी ! तुकाराम मुंडेंची शहरात  मोठी कारवाई, तब्बल 20..
आता नाशिकची बारी ! तुकाराम मुंडेंची शहरात मोठी कारवाई, तब्बल 20..
img
Nandini khandare More
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केल्या आहेत. दरम्यान आता नाशिकची बारी आली असून तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची नाशिक विभागात मोठी धडक कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल 20 हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांची तपासणी करण्यात आली.

अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने तब्बव 7 नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलीत. सुधारणा नोटीसचे पालन न करणाऱ्या आणखी रेस्टॉरंटवर देखील कारवाई होणार आहे. 

तपासणीत स्वयंपाकघरात अस्वच्छता, माश्यांचा व घाणीचा सापळा, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळले कारवाईदरम्यान आढळून आले. कोल्ड स्टोरेज व तापमानाच्या नियमांचे उल्लंघन देखील केले. अन्न दूषित होण्याचा धोका त्यामुळे निर्माण होतो. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याचेही निदर्शनास अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

सर्वांनी या मोहिमेचा धसका घेतला आहे. तुकाराम मुंडे यांच्या राज्यात कोणाचाही गय होत नाही. वाशिमही अन्न सुरक्षा प्रशासनाची धडक कारवाई बघायला मिळतंय. शहरातील 3 हॉटेलांची तपासणी त्यापैकी साई ढाब्याचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी या दोन हॉटेल ला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group