नाशिक : सप्तश्रृंगी गड ते नांदुरी या मार्गावरील घाट मार्गामध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सदरचा रस्ता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहील.
याबाबत कळवणच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये यांनी आदेश निर्गमित केले आहेत, असे आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवणचे कार्यकारी अभियंता उ. गो. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.