भोंदू अशोक खरात हा लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस अडकत आहे. या प्रकरणबाबत आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या विरोधात रोज नव नविन गुन्हे उघड होत आहेत. त्याच्या विरोधात आता नविन खुलासा समोर येत आहे. लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे.
आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर राखलं आहे.
एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खरं तर, अशोक खरातला अटक झाल्यानंतर ३१ मार्चपासून कल्पना खरात फरार आहे.
नाशिक पोलीस तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, कल्पना खरातकडून अटकपूर्व जामिनासाठी राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. कल्पना खरातच्या बाजुने कोर्टात वकील प्रशांत गिरी उपस्थित होते. त्यांनी कल्पना खरातची भूमिका मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले.
पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत मला माहीत नाही. माझ्या पतीने गंभीर गुन्हे केलेत, अशी कल्पना खरातची भूमिका असल्याचं वकिलांनी कोर्टात संगितलं. वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून सायंकाळी पाच वाजता कोर्ट याबाबत निर्णय देणार आहे. अशोक खरातच्या विविध गुन्ह्यात कल्पना खरातची साथ होती. तिच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले. तसेच तिच्या नावे खरातची संपत्ती देखील असल्याचा आरोप करण्यात आला होता.