कुंभमेळ्यातील ठेकेदारांवरून नवा वाद; बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय खळबळ
कुंभमेळ्यातील ठेकेदारांवरून नवा वाद; बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय खळबळ
img
Nandini khandare More

सध्या राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला असून पावसामुळे अनेक शहरांत मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.काहीठिकाणी रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी झाडे कोसळले कुठे दरड कोसळून जीवितहानी सुद्धा झाली आहे. 

दरम्यान आता ठाकरें गटातील प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुसळधार पावसामुळे ‘मिसिंग लिंक’ येथे दरड कोसळली होती, यावरही भाष्य केले. बोलता बोलता संजय राऊत यांनी आगामी कुंभमेळ्याबाबतही मोठा दावा केला आहे.

राऊत म्हणाले, “दोन लोकांचं बिंग या देशात फुटलेलं आहे. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. जे काय खड्डे पडतील, दोन खड्डे पडलेत. 6700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन, दलाली मिळाली ती वाहून गेली नाही. भाजपला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे पैसे वाहून गेले” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

पुढे संजय राऊत नाशिकमधील अगामी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बोलताना म्हणाले, “मिसिंग लिंक पाहून आता लोकांना भीती वाटतेय नाशिक कुंभमेळ्याची. नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? इन्फ्रा मॅनचा राइट हँड मॅन, जो महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट मंत्री आहे. संकटमोचन नाही, संकटलोचन आहेत ते!” असं म्हणत राऊतांनी गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “कुंभमेळ्यात किती भ्रष्टाचार होईल? लाखो लोकं तिथे येतील देशभरातून. सगळे ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिलेत, त्यामुळे अजिबात काम होणार नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group