अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, थेट...
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, थेट...
img
वैष्णवी सांगळे
राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणात रोजच नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्याने तेही चांगलेच अडचणीत सापडले. रुपाली चाकणकर यांना तर थेट पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 

Nashik : WhatsApp वरच्या ग्रूपमध्ये आधीच सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी ब्रेनवॉश

शिर्डी पोलिसांनीभोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना आज बजावली आहे.  भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली होती. समता पतसंस्थेत अनेक खाती अशी आहेत, जी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहेत, मात्र नॉमीनी स्वत: अशोक खरात हाच आहे.  या खात्यांवरून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.

प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावेही समता पतसंस्थेत चार खाती आहेत. या सर्व खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 33 खातेदारांनी जबाब नोंदवले  आहेत. प्रतिभा चाकणकर यांनाही जबाब देण्यासाठी शिर्डीत पोलीस ठाण्यात आता हजर राहावं लागणार आहे. शिर्डी पोलीसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्यांवर पोस्टाने नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group