भोंदूबाबा अशोक खरातच्या जामिनाचा फैसला पुन्हा लांबला; ''या'' तारखेला होणार पुढील सुनावणीची
भोंदूबाबा अशोक खरातच्या जामिनाचा फैसला पुन्हा लांबला; ''या'' तारखेला होणार पुढील सुनावणीची
img
Nandini khandare More

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यत खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणातील आरोपी भोंदू बाबा अशोक खरात याच्या जामिनाचा फैसला आणखी एकदा लांबणार पडला आहे . 

बुधवारी (दि. १६) या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार होती परंतु ती होऊ शकली नाही. त्यामुळे आता ३० सप्टेंबर रोजी या अर्जावर पुढील सुनावणी होणार असून, खरातचा कारागृहातील मुक्काम तूर्तास कायम राहिला आहे.

​या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. अॅड. निकम यांनी न्यायालयात स्वतः हजर राहत खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शवला आहे. खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर असून, त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो अथवा तपासात अडथळा निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती अॅड. निकम यांनी केली. ​

दुसरीकडे, ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान खरातच्या बाजूने वकीलच हजर न राहिल्याने बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली जाऊ शकली नव्हती. आता बुधवारीही सुनावणी टळल्याने जामिनाचा निर्णय ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला गेला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group