Ashok Kharat  :  चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशोक खरातकडून...; 'हर्षवर्धन सपकाळ' यांचा खळबळजनक दावा
Ashok Kharat : चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, अशोक खरातकडून...; 'हर्षवर्धन सपकाळ' यांचा खळबळजनक दावा
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर सध्याच्या मंत्रिमंडळातील एक डझन मंत्री तुरुंगात जातील, असा स्फोटक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी  बुधवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये खळबळजनक दावे केले आहे. 



हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट
सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. 

भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. 

पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली. भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group