Ashok Kharat  :  तुझे चांगले करीयर घडवील; पाणी प्यायली, डोकं जड पडलं अन क्षणात... खरातविरोधात ७ वा गुन्हा दाखल
Ashok Kharat : तुझे चांगले करीयर घडवील; पाणी प्यायली, डोकं जड पडलं अन क्षणात... खरातविरोधात ७ वा गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र  हादरला आहे. खरातची एकापाठोपाठ एक संतापजनक प्रकरणे आता समोर येत आहे. लैंगिक अत्याचाराचा गुन्ह्यातील स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.



दरम्यान आता अशोक खरातविरोधात ७ वा गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे.वासनांध अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन ४ वेळेस बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. सुरवातीला शेतात घर कुठे बांधावे, त्याचा मुहूर्त काय हे विचारण्यासाठी आई वडिलांबरोबर तरुणी 2021 मध्ये भोंदू अशोक खरातकडे गेली होती. जागा बाधित आहे, दोन वर्षे घर बांधू नका, असे सांगत कुटुंबाला पुन्हा बोलावून अशोक खरात घेत होता. कुठल्या फिल्डमध्ये शिक्षण घेऊ,चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच खरातने तिच्या आई-वडीलांना केबिन बाहेर काढले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रारीत म्हटलं आहे. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. 

जुलै 2024 मध्ये मी आई वडिल यांचे सोबत कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीन, नाशिक येथे गेले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मी कोणत्या फिल्ड मध्ये अॅडमीशन घ्यावे जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल याबाबत विचारले होते. तेव्हा अशोक खरात माझे आई वडिलांना बोलला की तुम्ही बाहेर जा मला हिच्याशी काही बोलायचे आहे. त्यावेळी त्याने मला विचारले की तुझे कॉलेज कसे चालू आहे. असे बोलून त्याने मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पीण्यासाठी दिले ते पाणी पिले असता ते मला थोडे बेचव लागले, त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझे डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले, आणि मला पण तो बोलेल तसे मंत्र बोलायला लावले व माझे पाठीमागे येऊन उभा राहीला. त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले आणि मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले.

त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला आणि बोलला की मी महादेवाचा अवतार आहे, माझेकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असे बोलून मला मंत्र बोलायला लावले. आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले. त्यावेळी मी विरोध केला तर तो मला बोलला की तू जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितले तर मी माझेकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भिती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group