राज्याला हादरवून सोडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातील अशोक खरातला आज पुन्हा एकदा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात आणि कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, खरात येण्यापूर्वीच कोर्टरूममध्ये वकिलांची मोठी गर्दी झाली होती. सरकारी वकील अजय मिसर (एसआयटीकडून) कोर्टात हजर झाले होते. आरोपीचा पुकारा झाल्यानंतर सुमारे १७ मिनिटांनी खरातला न्यायालयात आणण्यात आले. खरातला तोंडावर काळा कपडा बांधून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणले होते. आरोपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीशांनी त्याला कोर्टरूमच्या बाजूला उभे करण्याचे आदेश दिले.
कोर्टात खरातचे वर्तन
दरम्यान, न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना अशोक खरात मान खाली घालून उभा होता. यावेळी अशोक खरात स्वत:च्या हाताचे बोट पाहत होता.
अशोक खरात म्हणाला...
न्यायालयाने अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी काहो...तुम्हाला काही बोलायचे आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर वर मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी १०० च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिली, असं अशोक खरात म्हणाला.