सीएनजी कार घेऊन काय फायदा?
सीएनजी कार घेऊन काय फायदा?" दरवाढीमुळे वाहनचालकांचा सरकारवर रोष; लांबच लांब रांगा आणि आता वाढीव किमती
img
नितीशा कुलकर्णी








सध्या महागीने नागरीग हैराण झाले आहेत. जिवनावश्यक वस्तुंचे भाव गगणाला भिडत असल्याने सर्वसामान्य माणसांना त्याचा सर्वाधीक फटका बसत आहे. एकीकडे एलपीजीच्या किंमती वाढल्या असतानाच आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. सीएनजी भरण्यासाठी भरण्यासाठी नागरी मोठी गर्दी करत आहेत. त्यातच आता आजपासून सीएनजीची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे. सीएनजीच्या दरात कीती वाढ झाली आणि काय आहे सध्याचे दर जाणून घ्या. इंधन दरवाढीची टांगती तलवार असतानाच आता सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. राज्यात सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतकाच जर सीएनजी मिळत असेल तर मग सीएनजी कार घेऊन काय फायदा झाला अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली आहे.

एकतर सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहा आणि पुन्हा अधिक किंमत मोजा असा वाहनचालकांनी रोष व्यक्त केला आहे. सीएनजी दरवाढीत कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. आज सकाळीच नाशिककरांना पुन्हा महागाईचा झटका बसला आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो तब्बल १ रुपया ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ९३ रुपये ६५ पैसे असलेला सीएनजीचा  दर आता ९५ रुपये १५ पैसे प्रति किलो झाला आहे. तब्बल एका वर्षानंतर सीएनजीच्या दरात वाढ झाली असून, सीएनजी आणि डिझेलचे दर आता जवळपास समान पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.

रिक्षा चालक, उबेर चालकांची नाराजी
पुणे शहर ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवड शहरातही सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालक आणि ओला उबेर चालक नाराज झाले आहेत. सीएनजी दर वाढत आहेत मात्र आमचे भाडे आहे त्याच दरात आहे दुसरीकडे सातत्याने सीएनजी दरवाढ होत असल्याने व्यवसाय करायचा कसा असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे.सीएनजीची दरवाढ झाली असली तरी व्यावसाय करणे भागच आहे असं सांगत रिक्षा चालक ओला-उबेर चालक यांची सीएनजी गॅस स्टेशनवर गर्दी पाहायला मिळत आहे.

मध्यरात्रीपासून CNG च्या दरांमध्ये वाढ

1 किलो मागे तब्बल 1.50 रुपयांची वाढ

पूर्वी 93.65 प्रति किलो

रात्रीपासून CNG दर 95.15 प्रति किलो

एक वर्षानंतर CNG दरांमध्ये झाली वाढ

CNG आणि डिझेलचे दर जवळपास झाले सारखेच
इतर बातम्या
Join Whatsapp Group