सिहंस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्ववभूमीवर नाशिकमध्ये शहरातील रस्त्यांचे कामे सुरूअसून आता नाशिक करांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
द्वारका-नाशिकरोड महामार्ग रस्त्याच्या 221.51 कोटींच्या निधीसह कामाची घोषणा खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मंगळवारी (दि.26) मंत्री गडकरी यांनी त्यांच्या सोशल माध्यमाद्वारे याबाबतची पोस्ट टाकत माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत प्रस्ताव पाठविला होता. मात्र हा ह्या खर्चाचा दीर्घकालीन प्रकल्प असल्याचे केंद्र शासनाचे मत होते. सचिव स्तरावर याबाबत तातडीची कार्यवाही अशक्य असल्याचे खासदार वाजे यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या अडचणी दूर करण्यासाठी खासदार वाजे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना निधी मिळावा, हा आग्रह कायम ठेवला होता.
दरम्यान , त्यामुळे तत्पुरता पर्याय म्हणून या महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. दुतर्फा सर्विस रोड करण्यात येईल. त्यातून द्वारका ते दत्त मंदिर हा आठ पदरी रस्ता होईल यासाठी २२१.५२ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.