भोंदू अशोक खरातला मोठा झटका ! न्यायालयीन कोठडी कायम; गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
भोंदू अशोक खरातला मोठा झटका ! न्यायालयीन कोठडी कायम; गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
img
Nandini khandare More
भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राचीही न्यायालयाने दखल घेतली असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे

फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरोपीच्या वकिलांना पेनड्राईव्हमधील व्हिडिओ पुरावे दाखवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, सरकारी पक्षाने पेनड्राईव्ह आणि संबंधित कागदपत्रे आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यानुसार, व्हिडिओ पुरावे केवळ आरोपी आणि त्यांच्या वकिलांना पाहता येतील, मात्र त्यांची कोणतीही प्रत त्यांना देता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले जाईल. या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीने आतापर्यंत एकूण आठ दोषारोपपत्रे दाखल केली आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group