रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, तर एकनाथ शिंदेंचे... अंजली दमानियांकडून खळबळजनक माहिती समोर
रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, तर एकनाथ शिंदेंचे... अंजली दमानियांकडून खळबळजनक माहिती समोर
img
वैष्णवी सांगळे
भोंदूबाबा अशोक खरातच्या राजकीय कनेक्शनने मोठी उलथापालथ झाली आहे. अजून एकही राजकीय बळी गेला नसला तरी खरातचे सिंडिकेट मोठे असल्याचे तपासात समोर आले आहे. काही नेतेमंडळींची नावे समोर आली आहेत. त्यांचे खरात सोबतचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. पण प्रत्येक जण आपला आणि त्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आहेत. 



आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला. त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले. तर त्याला कोणत्या नेत्याने कितीवेळा फोन केला. दोघांमध्ये कितीवेळा बोलणे झाले याची इत्यंभूत माहिती अंजली दमानिया यांनी बाहेर आणली. त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला आहे. 

 अंजली दमानिया काय म्हणाल्या ?
अशोक खरात याच्या सीडीआरची मला कॉपी मिळाली आहे. मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. रुपाली चाकणकर म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये 10 इनकमींग, 7 आऊट गोईंग होते. यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असं गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. 

1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानियांच्या हाती लागला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॉल्स झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहे.  मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांचा एक कॉल अशोक खरातला झाला, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची माहिती घेतली. यामध्ये तृप्ती खरात पहिलं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोलल्या होत्या. आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे तिसरं नावं आहे. दिपक लोंढे यांचे 189 कॉल्स झाले होते. 30 हजार 529 सेकंद कॉल्स झाले. कतार, युएस, व्हर्जीन आयलंड, अशा देशातूनही अशोक खरातला फोन आले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group