अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणीत भर, चाकणकर 24 तास उलटूनही चौकशीसाठी  गैरहजर
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणीत भर, चाकणकर 24 तास उलटूनही चौकशीसाठी गैरहजर
img
वैष्णवी सांगळे
अशोक खरात  याच्यासोबतच्या ओळखीमुळे रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती आहे. 



रुपाली चाकणकर यांना खरात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आयटीकडून समन्स बजावण्यात आलंय. मात्र 24 तास उलटून गेल्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी एसआयटी समोर हजर झालेल्या नाहीत. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना अशोक खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का? याची चौकशी एसआयटीला करायची आहे. मात्र रुपाली चाकणकरांकडून एसआयटीच्या समन्सला कोणताच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. 

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group