ASHOK KHARAT : ‘प्रशासकीय अधिकारी बाहेर बसायचे, त्यांच्या पत्नी खरातच्या केबिनमध्ये जायच्या’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
ASHOK KHARAT : ‘प्रशासकीय अधिकारी बाहेर बसायचे, त्यांच्या पत्नी खरातच्या केबिनमध्ये जायच्या’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
img
वैष्णवी सांगळे
लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अनेक महिलांनी अशोक खरातवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली. अशोक खरात विरोधात जवळपास 11 तक्रारी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया आल्या आहेत. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात बाबत मोठा खुलासा केला आहे. ‘अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला सांगायचा’ असे म्हटले आहे.नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशोक खरात प्रकणावर प्रतिक्रिया दिली. 



विजय वडेट्टीवार म्हणाले, मंत्री, आमदार, शासकीय अधिकारी, आएएस, आयपीएस या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी सातत्याने म्हणतोय की अनेकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या बायका या खरातच्या ऑफिसमध्ये जात होत्या. प्रशासकीय अधिकारी बाहेर बसत अन् यांच्या बायका खरातच्या ऑफिसमध्ये जात असत.”

अंधश्रद्धेला, भोंदूगिरीला तुम्ही समर्थन केलं आहे. आत काय झालं हे मी आता सांगणार नाही, कारण याबाबत माझ्याकडे पुरावे नाहीत. पण जे व्हिडिओ पुढे येत आहेत, ते सिलेक्टेड येत आहेत. १००० च्या वर पुढे व्हिडिओ आहेत. पण १५० च व्हिडिओ समोर आले. ज्या महिला यात दिसत आहेत, त्यांच्या पतींवर कारवाई झाली पाहिजे. आपल्या कुटुंबाला घेऊन ते तिथे गेले, मग तेही दोषी आहेत”, असं म्हणत पीडित महिलांच्या पतींवर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, “नवीन प्रकरण आमच्यापुढे आले आहेत. हा खरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक-दुसऱ्यांच्या फॅमिली शेअर करायचा. किती खालचं आणि घाणेरडा प्रकार होता. महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणं, महाराष्ट्राची इभ्रत काढण्याचं हे प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, यापेक्षा दुर्दैवं काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.चाकणकर एकट्या नाहीत, केसरकर म्हणालेत की ३९ आमदार भेटले आहेत, माझं एकट्याचंच नाव का घेता? त्यामुळे हा आकडा १०० च्यावर जाईल. यात मंत्रीसुद्धा आहेत. चाकणकरांची चौकशी कराच, पण इतरांचीही करा, असंही ते म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group