भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील VIDEO मोबाईलमध्ये आहेत ? लगेच डिलिट करा, पोलीस...
भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील VIDEO मोबाईलमध्ये आहेत ? लगेच डिलिट करा, पोलीस...
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. या स्वयंघोषित ज्योतिषाने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर, तसेच गर्भवती महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. खरातचे हेच धक्कादायक आणि किळसवाणे व्हिडीओ सध्या समोर आले असून ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहे. 



या व्हिडीओमुळे विकृत अशोक खरातचा खरा चेहरा जगासमोर आला असला तरी पीडित महिलांचीही ओळख समोर येत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे पीडित महिलांच्या गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित होत आहे आणि याचमुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे तुमच्याही मोबाईलमध्ये खरातचे आक्षेपार्ह फोटो , व्हिडीओ असतील तर ते आताच डिलीट करा.  

कोपरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव येथील दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), २९४ (३) (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त केले आहेत. या प्रकरणात आरोपी खरातला अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोघा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे काही केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पीडितांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला शेअर किंवा फॉरवर्ड करू नये.


इतर बातम्या
Join Whatsapp Group