नाशिक जिल्हयातील सिन्नर येथील वासनांध भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. हे प्रकरण फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. हे प्रकरण नेमकं काय ? खरातचे व्हिडीओ , खरातच बॅकग्राउंड याबद्दल अनेक जण जाणून घेण्यास मोठे उत्सुक आहे त्यासाठी खरातचा शोध नेटिझन्स गूगलवर घेत आहे.
विशेष म्हणजे गेल्या ७२ तासांत गुगल सर्च इंजिनवर अशोक खरात हे नाव सर्वाधिक शोधले जाणारे नाव ठरले आहे. तसेच गुगल ट्रेंड्समध्ये या प्रकरणाने ब्रेकआऊट श्रेणी गाठली आहे. १७ मार्चपर्यंत ज्या नावाचा इंटरनेटवर कोणताही मागमूस नव्हता ते नाव २० मार्चला सर्च स्कोअरच्या १०० या उच्चांकावर पोहोचले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र गुगलवर काय शोधतोय?
गुगलवर प्रामुख्याने खरात न्यूज , ५८ व्हिडीओ, आणि अशोक खरात बॅकग्राउंड या कीवर्ड्सचा शोध घेतला जात आहे. अशोक खरातच्या कार्यालयातील छाप्यात एका पेनड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. यामध्ये काही हाय-प्रोफाईल महिला, अधिकारी आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या या प्रकरणाशी सर्वाधिक सर्च नाशिकमधील लोक करत आहेत. त्यानंतर संभाजीनगर, मुंबई आणि पुणे या शहरांतून या प्रकरणाशी संबंधित सर्च होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
थोडक्यात
अशोक खरात हा नाशिक जिल्हातील सिन्नर येथील असून अधिक खरातच्या प्रकरणाचा उलगडा नाशिकमधील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून झाला. खरातने पीडित महिलेच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून तिला भीती घातली. पूजेच्या बहाण्याने त्याने तिला ओस्नो जल पाजून २०२२ ते २०२५ या काळात वारंवार अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, त्याने या कृत्याचे चित्रीकरण करून पीडितेचा छळ केल्याचाही आरोप आहे. आतापर्यंत खराटवर ७ गुन्हे दाखल झाले आहे. आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. एसआयटीकसून त्याची कसून चौकशी सुरु आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, नरबळी, जादूटोणा केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.