महिलांचं योनी शुद्धीकरण अन... अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांबद्दल दत्तात्रय खेमनारांनी सगळंच सांगितलं
महिलांचं योनी शुद्धीकरण अन... अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांबद्दल दत्तात्रय खेमनारांनी सगळंच सांगितलं
img
वैष्णवी सांगळे
 नाशिकमधील वासनांध भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार करत असलेल्या या बाबाचे अनेक राजकीय भक्त होते त्यामुळे या प्रकरणाने संपूर्ण राज्यालाच हादरा बसला आहे. खरात याचे बड्या नेत्यांसोबतचे अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी टीकेच्या केंद्रस्थानी राहिल्या दरम्यान चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.



दरम्यान अशोक खरात याने 200 पक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा अंदाज 'खबरदार पुढारी' दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला. अशोक खरात याने शारीरिक अत्याचार केलेल्यांपैकी बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावाही खेमनार यांनी केले. 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत दत्तात्रय खेमनार यांनी अशोक खरातच्या अनेक काळ्या कृत्यांचा पाढा वाचला.

...तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल
 अशोक खरात या महिलांना म्हणायचा की, 'मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल. त्यासाठी तो महिलेला स्वत:चं मुत्र प्यायला लावायचा', असा खळबळजनक दावा दत्तात्रय खेमनार यांनी केला.

याशिवाय, अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला 'प्रेग्नंट' (गर्भवती) असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले, असेही खेमनार यांनी सांगितले.

अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा. ते पाणी बाटलीत भरुन देत असे. ते पाणी म्हणजे ओशनो जल आहे. हे पाणी प्यायल्यास तू एनर्जिटीक राहशील, तब्येत चांगली राहील. भविष्यात तुला खूप ताकद येईल, असे सांगून अशोक खरातने या मंत्र्याला गंडवले, अशी माहितीही दत्तात्रय खेमनार यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group