अशोक खरातला दणका, 'ते' मोठे बँक खाते सील
अशोक खरातला दणका, 'ते' मोठे बँक खाते सील
img
वैष्णवी सांगळे
 महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशोक खरातला यंत्रणांनी चांगलाच दणका दिला आहे. खरात यांच्या मालमत्तेचे आकडे हे चक्रावून सोडणारे आहेत. भोंदूगिरीच्या जोरावर त्याने अफाट साम्रज्य निर्मान केले अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपल्या तर दडपशाहीने मोक्याच्या जागांवर कब्जा मिळवल्याचे देखील समोर आले आहे. आता त्याच्या मालमत्ता आणि त्यासाठी कुठून निधी, पैसा आल्याची चौकशी होणार आहे. 



अशोक खरातला मोठा झटका मिळाला असून भोंदू अशोक खरात यांच्या शिवानिका संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. भामट्या खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाकडून त्याच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. 

खरात यांच्या कुटुंबियांच्या नावे किती संपत्ती आहेत. किती मालमत्ता, कुठे जमीन, कुठे प्लॉट, फ्लॅट, कार वा इतर साधनं आहेत, याची कुंडलीच आता बाहेर येणार आहे. त्याची जमीन, घर, दुकानांची चौकशी करण्यात येणार आहे. नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू झाला आहे. त्याने अनेकांना धमकी देत मोठी आर्थिक लूट केल्याचे समोर आले आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group