मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत धनंजय मुंडेंची एंट्री?
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत धनंजय मुंडेंची एंट्री?
img
Nandini khandare More
राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते राष्ट्रवादी पक्षात अलबेल नसल्याचं  चित्र दिसत होत याच दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  (अजित पवार गट) जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही एक “तांत्रिक चूक” असल्याचे स्पष्ट केले असून सर्व ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कायम राहील, अशी दुरुस्ती यादी लवकरच सादर करण्यात येईल असे स्पष्ट केले.

मिळालेल्या  माहितीनुसार, काल सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा सगळं सुरळीत होणार असल्याचं वृत्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत वरिष्ठ नेत्यांना स्थान असणार आहे, असं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये पटेल, तटकरेंसह, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील या नेत्यांची नावे असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group