Nashik Crime : लग्न जमवून देण्यासाठी भोंदूबाबाने स्मशानभूमीत केली अघोरी पूजा
Nashik Crime : लग्न जमवून देण्यासाठी भोंदूबाबाने स्मशानभूमीत केली अघोरी पूजा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्न जमवून देण्याचे सांगून स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जितू अण्णाराव पवार व विशाल रामदास खंडागळे (दोघेही रा. विजय चौक, फुलेनगर, पेठरोड) यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी जितू अण्णाराव पवार याच्यासोबत लग्न करण्यासाठी स्मशानात पुजा करण्याच्या बहाण्याने दोन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी लक्ष्मीबेन अशोकभाई शिंदे (रा. नांदूरनाका सिग्नलजवळ, मुळ रा. बलसाड गुजरात) यांच्याकडून वेळोवेळी 77 हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरुपात स्वीकारले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून फिर्यादीला जुने नाशिक येथील शितला देवी मंदिरासमोर असलेल्या अमरधाम येथे नेऊन तेथे मंत्रोच्चारासह पुजा करून फिर्यादीच्या डोक्यावरुन लिंबू उतरवून, लाह्या टाकून ते लिंबू गोदावरीत सोडले. व काही लिंब मृतदेह जाळतात त्या ठिकाणी सोडून दिले व पुजा केली. 

ऐवढे करुनही फिर्यादीसोबत संबंधित तरूणी लग्न करण्यास तयार नसल्याने आरोपी भोंदूबाबा विशाल खंडागळे याने आणखी पुजा करावी लागेल, असे सांगत जादा पैशांची मागणी केली. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आली. आरोपी जितू पवार व विशाल खंडागळे यांनी स्मशानभूमित पुजा करण्याच्या बहाण्याने फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी 77 हजार रूपये स्वीकारुन फसवणूक केल्याची बाब लक्षात आली.

त्यानंतर शिंदे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादू टोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group