धक्कादायक ! आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More
राज्यभरात सध्या अनेक खळबळजनक घटना घडत असून आता एका आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघरमधील आश्रमशाळेतील ही  घटना आहे. . पालघर जिल्ह्यातील मासवन येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याची तब्येत बरी नव्हती. दरम्यान या घटनेमुळे राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

श्रीयांश शैलेश आंबात असे मृत मुलाचे नाव आहे. श्रीयांश हा इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता. दरम्यान मासवन येथील आश्रमशाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजलीय. गेल्या काही दिवसांपासून श्रीयांशला ताप येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली. अवघ्या महिनाभरात याच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सध्या शाळेतील 26 विद्यार्थी तापाने आजारी असून त्यांच्यावर जवळच्या मासवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत .एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजारपणाचे प्रमाण आणि महिनाभरातील दोन मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाने याची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तातडीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याप्रकरणी जयेश तासवी म्हणाले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलीला विचारलं की, विद्यार्थी आजारी का पडत आहेत, त्यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गार पाणी दिलं जातंय.पाणी गरम करण्याचं गिझर खराब झालंय. गेल्या तीन महिन्यापासून हीच स्थिती आहे. जे विद्यार्थी रुग्णालयात दाखल झालेत त्या सर्वांना ताप आलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group