कुणालकडे आधीच iPhone होता मग डोंगरावर का गेला? प्रत्यक्षदर्शीने नेमकं काय सांगितलं ?खवड्या डोंगरावर नक्की काय घडलं ?
कुणालकडे आधीच iPhone होता मग डोंगरावर का गेला? प्रत्यक्षदर्शीने नेमकं काय सांगितलं ?खवड्या डोंगरावर नक्की काय घडलं ?
img
Nandini khandare More

काल छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत विदारक घटना समोर आली आहे. डोंगरावरून वुई मारणाऱ्या मुलाला वाचवण्याकरता गेलेला बाप  कोसळला आणि त्याचा पाठोपाठ आईनेही उडी मारली.  कुणाल मुरलीधर चांदवडे  मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेत मुलाने आयफोन साठी आत्महत्या केली असल्याच सांगितलं जात होत परंतु आता या प्रकरणातून अनेक खुलासे होत असून आता प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं त्यावरून कुणालने  इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न समोर येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. 

दरम्यान, Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी कुणाल आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु प्रत्यक्षदर्शी आणि गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती दिली. 

प्रत्यक्षदर्शी संजय जाधव काय काय म्हणाले? 
कुणालने आयफोनमुळे आत्महत्या केली अशी चर्चा होती. यात एक प्रत्यक्षदर्शीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयफोनबाबत बोलताना दिसतोय. आम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये ज्यांचा आवाज आहे. त्यांना एबीपी माझाने शोधून काढले. त्यांचं संजय जाधव असं नाव आहे. मुलाला आयफोन हवा होता, अशी कुठलीही चर्चा तिथं नव्हती. प्रत्यक्षात त्या मुलाजवळ आयफोनच होता, असं प्रत्यक्षदर्शी आणि माजी सरपंच संजय जाधव म्हणाले. तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील किती लाड करतात, असं म्हणत मी कुणालची समजूत काढत होतो, असं संजय जाधव यांनी सांगितले.

डीसीपी रत्नाकर नवले काय म्हणाले? 
आयफोन हवा होता म्हणून कुणालने आयुष्य संपवलं, अशी आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. पण तपास पुढे सरकला आणि या चर्चेलाच आता पोलिसांनी ब्रेक लावला. आयफोन हे आत्महत्येचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसत नाही, असं डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केलंय. 

पोलीस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group