१७ ऑगस्ट २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपप्रवण मानल्या जाणार्या जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा व दिंडोरी या तीन तालुक्यांमधील काही गावांमध्ये पुन्हा एकदा सोमवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केलेले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पेठ तालुक्यामधील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ व हरणगाव येथे सोमवारी दुपारी 12.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, तर दिंडोरी तालुक्यात ननाशी व बाडगीचा पाडा परिसरात, तसेच सुरगाणा, बोरगाव परिसरात दुपारी 12.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सर्व धक्के सौम्य असून, यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
Copyright ©2026 Bhramar