स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी निघालेल्या मुलींवर काळाचा घाला ! ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ मुलींचा मृत्यू
स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी निघालेल्या मुलींवर काळाचा घाला ! ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ मुलींचा मृत्यू
img
Nandini khandare More
अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून ट्रॅफिकसह, भरधाव धावणाऱ्या गाड्या अपघाताचे कारण आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनी एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण देश आज ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करत असतानाच महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हिंगणघाट शहरावर भीषण शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. 

उपचारादरम्यान तिन्ही मुलींची प्राणज्योत मालवली समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या, त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या अन् गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या तिन्ही निष्पाप मुलींची प्राणज्योत मालवली. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group