पुण्यात डीजे आणि डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या विद्यानंद बापट हे पुन्हा चर्चेत आले आहेत. विद्यानंद बापट यांच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे. दरम्यान आत आयाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून बापट निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि विद्यानंद बापट यांच्यात चर्चा झाली. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर बापट यांच्या राजकारणात येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. आज विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा खुलासा केला. 'संधी मिळाल्यास नक्की भविष्यात राजकारणात येऊ. पण राजकारणात विचारांच्या अनेक मर्यादा असतात.', असे मत त्यांनी व्यक्त केले
विद्यानंद बापट हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्यात सुरू आहेत. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि विद्यानंद बापट यांच्यात चर्चा झाली. वकील असीम सरोदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'विद्यानंद तातडीने विचार करणारा नाही त्यामुळे तो वेळ घेऊन यावर आपलं मत मांडेल. सध्या राजकारणात कशी लोक आहेत माहिती आहे त्यामुळे विद्यानंद सारखे लोक हवी आहेत. मी टाकलेल्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मोठ्या राजकीय पक्षाकडून ही याबाबत मला विचारणा झाली आहे. पण मी आता नाव घेणार नाही.'
‘विद्यानंद बापटने पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का?’ असा सवाल असीम सरोदे यांनी पुणेकरांना केला होता. ध्वनीप्रदूषणाविरोधात बापट निर्भयपणे भूमिका मांडत असल्याचा असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला होता. विद्यानंद बापट तातडीने विचार करणारा नाही त्यामुळे तो वेळ घेऊन यावर आपलं मत मांडेल. सरोदे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.