घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या आणि सब्सिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून LPGच्या सब्सिडीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. LPG सब्सिडीच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सब्सिडी सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागणार असल्याची माहिती आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रायलाच्या माहितीनुसार, सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (BAA) पूर्ण करणं महत्त्वाचं आनव्या नियमानुसार, ज्या घरगुती LPG ग्राहकांनी अजून बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन केलेलं नाही, त्यांना १ ऑक्टोबरपासून सब्सिडीच्या दरात सिलिंडर रिफिल बुक करण्यासाठी ही प्रोसेस पूर्ण करावी लागेल. मात्र, ऑथेंटिकेशन केलं नाही म्हणून सिलेंडर मिळणे बंद होणार नाही. अशा ग्राहकांना सिलेंडर मिळेल, पण त्यांना तो बाजारभावाने खरेदी करावा लागेल आणि सब्सिडीचा लाभ मिळणार नाही.
सरकारच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरपर्यंत ८९.९ टक्के सक्रिय LPG ग्राहकांनी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण केलं आहे. सब्सिडीचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि घरगुती LPG चा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर थांबवणं हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ऑथेंटिकेशन कसे कराल? तुम्ही LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळी, संबंधित LPG वितरकाच्या शोरूममध्ये किंवा तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे आधार ऑथेंटिकेशन करू शकतात. Indane ग्राहक Indian Oil ONE, Bharatgas ग्राहक HelloBPCL, तर HP Gas ग्राहक HP PAY अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
दरम्यान, सप्टेंबर २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरवरील अप्रत्यक्ष सब्सिडीचा अंदाज २१० रुपये आहे. जूनमध्ये हा आकडा सुमारे ७२१ रुपये होता. सरकारने FY२३ मध्ये तेल कंपन्यांना २२,००० कोटी रुपये भरपाई दिली होती, तर FY२६ आणि FY२७ मध्ये सुमारे ३०,००० कोटी रुपये भरपाई देण्याची माहिती देण्यात आली आहे.