लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! या आठवड्यात ''या'' तारखेला खात्यात जमा होणार ₹1500
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! या आठवड्यात ''या'' तारखेला खात्यात जमा होणार ₹1500
img
Nandini khandare More
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी गुड न्यूज आहे. गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात या आठवड्यात लाडकींना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळतील असे सांगितले जात आहे. पण त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये सरकार जमा करणार आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. 

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिनयाचा हप्ता वितरीत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. २४ सप्टेंबरनंतर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group