लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! रक्षाबंधनाच्या आधी जुलैचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! रक्षाबंधनाच्या आधी जुलैचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
img
वैष्णवी सांगळे
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याबाबत गुरुवारी महत्त्वाची माहिती दिली. रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायला सुरुवात झाली आहे. बुधवारपासून पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे, असे तटकरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. रक्षाबंधन ९ ऑगस्‍ट रोजी आहे. त्‍यापूर्वी महिलांच्या खात्‍यावर ६ ऑगस्टपासून लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

हे ही वाचा ! 
हृदयद्रावक ! मैत्रिणींना पार्टी दिली अन त्यानंतर आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर

बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
बोगस लाभार्थ्यांबाबत त्या म्हणाल्या की, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला पुढचा १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.  १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. जर पुरुषांनी अथवा निकषात न बसणाऱ्या महिलेने याचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group