लाडक्या बहि‍णींना मोठं आश्वासन ! लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
लाडक्या बहि‍णींना मोठं आश्वासन ! लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना लाडक्या बहि‍णींना मोठं आश्वासन दिलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (3 फेब्रुवारी 2026) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही सभा आयोजित करण्यात आली होती. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तसेच योग्य वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील असे ते म्हणाले. 

एकनाथ शिंदे म्हणाले, माझी सर्वात आवडती आणि महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर सुरुवातीला अनेकांनी टीका केली, पण ही योजना सुरू करणं हे धाडसाचं पाऊल होतं. दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी रुपये खर्च येत असतानाही, ही योजना राबवण्यात आली. या योजनेमुळे भविष्यात अनेक गंभीर आणि सकारात्मक सक्सेस स्टोरी समोर येतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

महत्त्वाचं विधान करताना CM एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की,"ही योजना कधीही बंद होणार नाही. तसेच योग्य वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील, ही बाब नाकारत नाहीय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group