खुशखबर ! लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता ''या'' तारखेला मिळणार
खुशखबर ! लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता ''या'' तारखेला मिळणार
img
Nandini khandare More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नुकतेच सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पाठवले होते. दरम्यान, आता लाडकी योजनेचे मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

लाडक्या बहिणींना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे महिलांच्या बँक खात्यात यायला सुरुवात झाली होती. आता जून महिन्याचे सहा दिवस होऊन गेले तरीही अद्याप मे महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांना मिळालेले नाहीत. दरम्यान, आता याच मे महिन्याच्या लाभाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभाातील सूत्रांनुसार मे महिन्याचा लाभ मिळण्यास लवकरच सुरूवात हऊ शकते. जून महिन्याच्या 12 ते 15 या तारखेदरम्यान कधीही महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group