लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत महिला २१०० रुपये मिळण्याची वाट पाहत आहेत.
लाडकी बहीण योजनेत अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात. १ फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार नाही. देशाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत कोणताही निर्णय होणार नाही.
लाडकी बहीण योजनेबाबतचा निर्णय हा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात होऊ शकतो. राज्याचे अर्थसंकल्प मार्च महिन्यात होणार आहे. या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा करु शकतात.