लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिना सुरु होऊन १० दिवस उलटून गेले तरीही ऑगस्टच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती. त्यामुळे महिला चिंतेत होत्या. मात्र, आता हे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.