लाडक्या बहिणींची चिंता वाढली, 'या' जिल्ह्यातील २१ हजार महिलांचे अर्ज बाद
लाडक्या बहिणींची चिंता वाढली, 'या' जिल्ह्यातील २१ हजार महिलांचे अर्ज बाद
img
दैनिक भ्रमर
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची चिंता वाढवणारी बातमी आहे. अनेक लाडक्या बहि‍णींचे अर्ज सध्या बाद केले जात आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. सध्या अमरावतीत ६ लाख ९५ हजार ३५० महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील ४७ महिलांनी स्वतः हून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे.  त्यामुळे या महिलांना आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, इतर योजनांचा लाभ घेत आहे अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group