राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे वादाचा विषय ठरली आहे. दरम्यान, विधासभा निवडणुकीवेळी महायुतीच्या नेत्याकडून लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आली. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना हे २१०० रुपये केव्हा पासून मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता यावरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या बहिणींना १५०० रुपये मिळत आहे. त्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी २१०० रुपये देऊ, असे उत्तर दिले आहे. आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रश्नावर मिश्किलपणे उत्तर दिले. २१०० रुपये कधी मिळणार? यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्याचा पहिला अर्थसंकल्प झाला आहे. याबाबत पाच अर्थ संकल्प होतील. बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री, दोन मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट घेतील. बहिणांना २१०० रुपये कधी द्यायचे ते राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून ठरवतील. लाडक्या बहिणींना २१०० रुपये अमुक एका वेळेला देऊ, असे कोणीच सागितले नव्हते. सरकारला ज्यावेळी शक्य होईल, त्यावेळी २१०० रुपये दिले जातील.