लाडक्या बहीणींनो लक्ष द्या ! १८ नोव्हेंबरपूर्वी हे काम करून घ्या , नाहीतर ...
लाडक्या बहीणींनो लक्ष द्या ! १८ नोव्हेंबरपूर्वी हे काम करून घ्या , नाहीतर ...
img
वैष्णवी सांगळे
महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांसाठी लाभदायक ठरत आहे. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता याच ला़की बहीण योजनेसंदर्भात आणखई एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. त्याच संदर्भातील हे नवे अपडेट आहे.



या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांना E- KYC पूर्ण करावी लागणार असून त्यासंदर्भातील एक पोर्टलही विकसित करण्यात आले आहे. मात्र आता या E- KYCची अंतिम तारीख समोर आली असून त्या तारखेपूर्वीच सर्व लाभार्थी महिलाना E- KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरूीन ट्विट करत माहिती शेअर केली आहे. 




दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते.” असे मंत्री आदिती तटकरे यांनी या ट्विटमध्ये नमूद केले. 

म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेआधीच पात्र लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group