लाडकी बहीण योजनेचंग अनेक महिलांना लाभ होत आहे. मात्र अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन सरकारची मोठी फसवणूक केली होती. यावरच आला ठेवण्यासाठी सरकारने अनेक महिलांची पडताळणी करत या महिलांना अपात्र करत योजनेचा लाभ बंद केला होता मात्र यात अनेक पात्र महिलांचाही योजनेचा लाभ बंद झाला होता.
आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अनेक महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारने अपात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा फेरपडताळणी होणार आहे. महिला व बालविकास विभागाने अपात्र महिलांबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. यातून अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये काहींचे उत्पन्न जास्त आहे तर काही लाभार्थी महिला या सरकारी कर्मचारीदेखील आहे. यामुळे या लाभार्थी महिलांचे अर्ज बाद केले आहेत. लाखो महिलांचे अर्ज बाद झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर होता.
मात्र, आता याच अपात्र महिलांना शेवटची संधी देणार आहेत. या महिलांची पुन्हा एकदा शेवटची फेरपडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला खरच पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहेत. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २६ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये महिलांना वयोमर्यादेत बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला. या फेरपडताळणीतून ज्या महिला पात्र आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पडताळणीनंतर महिलांना योजनेचा लाभ मिळेल.