महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत एक मोठी तांत्रिक चूक समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या एका गुंतागुंतीच्या प्रश्नामुळे तब्बल २४ लाख लाभार्थी महिलांना चुकून 'शासकीय कर्मचारी' समजले गेले. यामुळे या महिलांचे योजनेचे पैसे मिळणे तात्पुरते बंद झाले असून, आता या त्रुटीच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. काही महिलांना ई केवायसी करुनदेखील डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याचसोबत अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे, ओटीपी आणि वेबसाइटवर एरर येत असल्याने केवायसी केले नाही.या महिलांचा लाभ तर बंद झालाच आहे. परंतु ज्या महिला पात्र आहेत आणि केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, आता केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. याचसोबत ज्या महिला खरंच निकषांमध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास २५ लाख महिला केवायसी करु शकले नाहीत. त्यांचाही लाभ बंद केला गेला आहे. मात्र, केवायसीमध्ये चुक झालेल्या महिलांना ही चुकी सुधारण्याची संधी मिळणार आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आता तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. राज्यातील सुमारे १ लाख अंगणवाडी सेविकांवर या २४ लाख लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांची माहिती पुन्हा एकदा तपासून घेतील.लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये माहिती चुकलेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
ज्या महिलांनी केवळ तांत्रिक चुकीमुळे सरकारी नोकरीच्या प्रश्नाला 'हो' म्हटले होते, त्यांची पडताळणी पूर्ण करून त्यांना पुन्हा एकदा योजनेच्या प्रवाहाखाली आणले जाईल. वस्तुस्थिती तपासून महिलांना ई केवायसीसाठी संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल. चूक दुरुस्तीनंतर महिलांचा लाभ सुरु होईल. अशी पुढे येत आहे.