राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून सरकारने विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर लाखो लाडक्या बहिणी सरकारकडून २१०० कधी मिळणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत.
दरम्यान आता सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही तरतदू करण्यात आलेली नाही. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यातच आता या मुद्द्यावरुन विरोधकांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.
“अजित पवारांनी आतापर्यंत 11 वेळ अर्थसंकल्प मांडला. 13 अर्थसंकल्पचा आतापर्यंत रिकॉर्ड आहे. तो दादा या टर्ममध्ये मोडतील.आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. 2100 देण्यावर आमचं काम सुरू आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचं आहे. मागच्या ट्रेंडच्यानुसार पैसे देण्यात आले आहेत. वाटलं तर पैसे वाढवता येतील. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. आपण बॅलेन्स तयार करत, आपण आश्वासनं पूर्ण करु”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
“एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. आम्ही घोषणा करू, पुढील महिन्यातून 2100 मिळणार. तसे मग देऊ. काही लपून घोषणा करणार नाही, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अजित पवारांनीही मी शब्दांचा पक्का आहे”, बहिणींना नाराज करणार नाही, असे म्हटले.