लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार? 'या' दिवशी खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता
लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार? 'या' दिवशी खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतुन सरकार लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देत आहेत. ज्यामुळे महिलांना फायदा होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत. 

मागे काही वेळेस एकत्रित दोन महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे त्या अनुषंगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. जर सप्टेंबरचा हप्ता अजून पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यातदेखील पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सप्टेंबरचा हप्ता अजून पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यातदेखील पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


इतर बातम्या
Join Whatsapp Group