राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापित डिसेंबरचा हफ्ता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, याच दरम्यान आत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज दिली.
नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.
अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. 23 डिसेंबरपासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.तसेच , लाडकी बहीण योजनेचे निकष तूर्तास तरी बदलण्यात येणार नाहीत असं फडणवीस यांनी स्वत: अधिवेशनात सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.