उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक : म्हणाले,
उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक : म्हणाले,
img
Dipali Ghadwaje
जनसुरक्षा विधेयकावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. जनसुरक्षा विधेयकावरून विधानपरिषदेत गोंधळ पाहायला मिळाला. जनसुरक्षा विधेयक विधानसभेनंतर आता विधानपरिषदेतही मंजूर झालं आहे. याच विधेयकाला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. 

उद्धव ठाकरे यांनीही जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे राज्यातील फक्त दोन तालुक्यात नक्षलवाद राहिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्यामुळे नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेत मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावर आक्षेप घेतला.

उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधयेकावरून महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात जन सुरक्षा कायदा हा विधानसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. त्याचा दुरुपयोग करत आहेत. 

सरकार सांगताना नक्षलवादाचा बिमोड करण्याविषयी सांगत आहेत. परंतु या बिलात कुठेही नक्षलवादाचा उल्लेख नाही. सुरुवातीला फक्त कडवी डाव्या विचारांच्या संघटनांचा उल्लेख आहे. डावं आणि उजवं याचा फरक करायला पाहिजे. शिवसेना उजव्या विचारसणीची आहे. पण आता डावं-उजवं करण्याची गरज नाही. संविधानाच्या प्रस्तावतनेत सर्वसमावेशकता आहे'.

'आम्ही या बिलावर बोलताना देशाच्या विरोधातील विचारांचा बिमोड करण्यासाठी देशासोबत आहोत. पण तुम्ही राजकीय हेतूने बिल आणत असाल, तसा त्याचा वासही येत आहे. नक्षलवाद शब्द बिलात नाही. आधी मिसा आणि ताडा कायदा होता. तसा दुसरा जन सुरक्षा कायदा आणत आहेत. खरंतर याला जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा असं नाव करा, असं त्यांनी म्हटलं.

आम्ही विधेयकाला समर्थन देऊ, पण तुम्ही बिलातून शब्द बदला. देशविघातक, देशद्रोही असे शब्द त्यात आणा. हे मोघम बिल आणलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'आम्ही या बिलावर बोलताना देशाच्या विरोधातील विचारांचा बिमोड करण्यासाठी देशासोबत आहोत. पण तुम्ही राजकीय हेतूने बिल आणत असाल, तसा त्याचा वासही येत आहे. नक्षलवाद शब्द बिलात नाही. आधी मिसा आणि ताडा कायदा होता. तसा दुसरा जन सुरक्षा कायदा आणत आहेत. खरंतर याला जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा असं नाव करा, असं त्यांनी म्हटलं. आम्ही विधेयकाला समर्थन देऊ, पण तुम्ही बिलातून शब्द बदला. देशविघातक, देशद्रोही असे शब्द त्यात आणा. हे मोघम बिल आणलं आहे, असंही ते म्हणाले.


'योगेश कदम यांनी बिल मांडलं. धमकावणीला बळी पडून जे तिकडे गेले, त्यांनीच बिल मांडलं आहे. या कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल. असा आमचा समज आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद असे शब्द त्यात असले पाहिजे. त्यामुळे यात सुधारणा आणा, अशी आमची भूमिका आहे. नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी, असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group