राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणुका पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या उमेदवरी अर्ज दाखल करणे सुरु आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली आहे. राजकिय पक्षांनी काल पासून यादी जाहीर करण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. शिवसेना-मनसे युतीकडून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली आहे. ज्या जागा शिवसेनेसाठी निश्चित झाल्या आहेत, त्या जागांवरती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री मातोश्रीवरून एबी फॉर्म दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मातोश्रीवर काल रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. काल रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक जणांना एबी फॉर्म दिले असल्याच समजतंय. तसेच मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना संधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली आहे.
ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात आले एबी फॉर्म
प्रभाग क्र ३- रोशनी कोरे गायकवाड
प्रभाग क्र २९ – सचिन पाटील
प्रभाग क्र ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्र ४९ – संगीता संजय सुतार
प्रभाग क्र ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र ५७ – रोहन शिंदे
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६० – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ – सबा हारून खान
प्रभाग क्र ६५ – प्रसाद प्रभाकर आयरे
प्रभाग क्र– ८९- गितेश राऊत
प्रभाग क्र ९३ – रोहिणी कांबळे
प्रभाग क्र ९५ – एड हरी शास्त्री
प्रभाग क्र. १०० – साधना वरस्कर
प्रभाग क्र १०५ – अर्चना चौरे
प्रभाग क्र १११ दिपक सावंत
प्रभाग क्र११७- श्वेता पावसकर
प्रभाग क्र. १२४ – सकीना शेख
प्रभाग क्र. १२७ – स्वरूपा पाटील
प्रभाग क्र१३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग क्र– १४१ – विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र – १४२ – सुनंदा लोकरे
प्रभाग क्र १४८ प्रमोद शिंदे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र १५५ स्नेहल शिवकर
प्रभाग क्र. १५६ – संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ – साईनाथ साधू कटके
प्रभाग क्र १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग क्र. १६८ – सुधीर खातू
प्रभाग क्र २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्र २०८ रमाकांत रहाटे
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक