राज ठाकरे संतापले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले, आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर ; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
राज ठाकरे संतापले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले, आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर ; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या आक्रमकतेपुढे राज्य निवडणूक आयोगाची भांबेरी उडालेली दिसली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे, शेकाप यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. प्रश्नांच्या सरबत्तीने आयोगाचे अधिकारी गांगारून गेल्याचे दिसून आले. मतदार याद्यातील घोळावरील प्रश्नावरून आयोगाला या नेत्यांनी खिंडीत पकडल्याचे दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.


मुलीचे वय १३४ आणि वडिलांचे वय ४०, कुणी कुणाला काढले? मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला संतप्त सवाल केला. मनसे अन् मविआचे सर्वपश्रीय शिष्टमंडाने आज शिवालयमध्ये आयोगाची भेट घेतली. यावेळी मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरलं. जोपर्यंत सर्व पक्षाची सहमती येत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली. राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. VVPAT तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

तर यावेळी बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य असा सवाल राज ठाकरे यांनी केला. यावर निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाले. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचे सांगा. निवडणूक पुढे ढकला. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group