एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
img
वैष्णवी सांगळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यांना या भेटीवर प्रश्न विचारला असता तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर आमचं बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी यांच्या विरुद्ध आमच टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राशी बेइमानी केली. जे नंदनवन तुम्ही सांगतात ते शिवसेना चोरीतून झालेलं आहे. या भांडणात आमचा जय होईल. या भेटीबाबत मला काही वाटत नाही. मी त्या विषयाकडे पाहत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group