महानगरपालिका निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार सुरु आहे . आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आजही अनेक राजकीय भूकंप पहायला मिळत आहे. तिकिटावरून नाराजी नाट्य सुरूच आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यामध्ये मोठा धक्का बसलाय.
उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याआधी काही तास ४ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मुंब्र्यातील चार नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजन किने, अनिता किने ,मोरेश्वर किने या सर्व माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला आहे.
मुंब्रा शिवसेना शाखेचा वादामध्ये राजन किने यांचा मोठा सहभाग होता. मुंब्रा मध्ये शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंब्रातील राजकीय खेळी बदलण्याची शक्यता आहे.