जैन मुनींकडून जनकल्याण पार्टीची घोषणा, पक्षचिन्ह असेल कबुतर
जैन मुनींकडून जनकल्याण पार्टीची घोषणा, पक्षचिन्ह असेल कबुतर
img
वैष्णवी सांगळे
मुबंईत कबुतर प्रकरण चांगलंच गाजलं. कबुतर प्रकरणामुळे मराठी माणूस आणि जैन समाज दोघांमध्ये विरोधाची भूमिका पहायला मिळाली. कबुतरांच्या आत्मशांतीसाठी आज जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी मोठी घोषणा केली. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू, आता आमची देखील संघटना असणार आहे. कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली. 


तर धर्मसभेत मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य जैनमूनी कैवल्य रत्न महाराज यांनी केले. जैन धर्मीय लोक सर्वात जास्त टॅक्स भरतात, असे देखील जैनमुनींनी म्हटले. आता यावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले की, याचा अर्थ तुम्ही मुंबईवर हक्क सांगणार की काय? टॅक्स भरताय म्हणजे काय? संपूर्ण देशात महाराष्ट्रातील जमीन सुपीक आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मान मोडेपर्यंत इमानाने काम करतो. तो कुणालाही फसवून बँकेला बुडवून परदेशात जात नाही. तो ज्याच्याकडे काम करतो त्याच्याकडे अत्यंत इमानाने काम करतो. हे मराठी माणसाचे योगदान आहे. मराठी माणसाने अत्यंत सहिष्णूपणे इतर प्रांतीयांना इकडे जागा दिली आणि तेच आता मुंबईवर हक्क सांगण्याचा डाव करत आहेत, असे त्यांनी म्हटले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group