बाईsss....मोहक अदा, सावरणारे केस अन् ग्लॅमरचा तडका ; 'मॉडेल चायवालीने', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
बाईsss....मोहक अदा, सावरणारे केस अन् ग्लॅमरचा तडका ; 'मॉडेल चायवालीने', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चहा-वडापाव विकणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. याचे कारण म्हणजे, रस्त्यावर चहा-वडापाव विकणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि पैसाही मिळतोय. याचे सर्वात मोठे उदाहरण 'डॉली चायवाला', 'ग्रॅज्युएट चायवाली' आणि 'वडापाव गर्ल' आहेत.

सोशल मीडियावर फेमस झालेल्या डॉली चायवाल्याला आता टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये नवीन चहावाली आली आहे. मॉडेल चायवाली असं तिचं नाव असून तिच्या अदा पाहूनच लोकांचे होश उडत आहेत.
 
डॉली चायवाला आणि वडा पाव गर्लनंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती मॉडेल चायवाली. सध्या लखनऊमध्ये चहा विकणाऱ्या या स्टायलिश मॉडेल चायवालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून कुणी त्याचं कौतुक करतंय तर कुणी त्यावर विनोदी कमेंट करताना दिसतंय. 

मॉडेल चायवालीची स्टाईलच निराळी 

सोशल मीडियावर अलीकडे मॉडेल चायवालीची स्टायलिश स्टाईल सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मॉडेल चायवाली ही स्कुटीवरून येते आणि गाड्यावर येताच कामाला सुरूवात करते. सर्वप्रथम ती गुलाबाची चव असलेला चहा बनवण्यास सुरुवात करते. दुसरीकडे, मॅगी तडका देखील तयार होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चहा बनवल्यानंतर ती गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवते आणि लोकांना देते.

मॉडेल चायवाली का व्हायरल होत आहे?
 
'मॉडेल चायवाली' ची ओळख केवळ तिच्या चहाच्या स्टॉलसाठीच नाही तर तिच्या फॅशनेबल लूक आणि हसऱ्या चेहऱ्यामुळेही आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या टपरीवर चहा बनवताना मॉडेलप्रमाणे पोझ देते आणि ग्राहकांशी संवाद साधते. तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा ही इतर चहावाल्यांपेक्षा वेगळी बनवते. हा नवा ट्रेंड लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. 

'मॉडेल चायवाली'च्या चहाच्या स्टॉलवर तरूणांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे ते तिच्या चहाच्या चवीसोबतच तिच्या स्टाइलचे कौतुक करताना थकत नाहीत. तर काहींनी त्यावर विनोदी कमेंटही केल्या आहेत.  

'मॉडेल चायवाली'चा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर thehungrypanjabi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group