मुंबई : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नं महाराष्ट्रातील महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 31 मार्च 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होईल , म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून प्रवाशांना अधिक टोल भरावा लागणार आहे.
या दरवाढीमुळं महाराष्ट्र मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग टोल दर अंदाजे 3% नं वाढेल, प्रवासी कार मालकांना प्रति ट्रिप 10 रुपयांपर्यंत जास्त पैसे द्यावे लागतील.
लखनऊ महामार्ग, दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे, NH-9 आणि दिल्ली-जयपूर महामार्गावरून प्रवास करणे महाग होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात टोल दरात झालेली ही दुसरी वाढ आहे, यापूर्वी जून 2024 मध्ये टोलचे दर वाढवण्यात आले होते.
किती आहे नविन टोल दर
हलक्या व्यावसायिक वाहनांना 275 रुपये आणि ट्रकना प्रति ट्रिप 580 रुपये टोल भरावा लागेल. NH-9 वरील छिजारसी टोल प्लाझावर कार टोल 170 रुपयांवरून 175 रुपये, हलकी व्यावसायिक वाहने 280 रुपये आणि बस व ट्रकसाठी 590 रुपये होतील. सातपेक्षा जास्त एक्सल असलेल्या मालवाहनांसाठी सर्वाधिक वाढ होणार असून, त्यांच्या टोलमध्ये 590 रुपयांची वाढ होईल. याव्यतिरिक्त, गाझियाबाद ते मेरठसाठी टोल 70 रुपयांवरून 75 रुपये होईल. हे दर 31 मार्चपर्यंत लागू राहतील आणि त्यानंतर नवीन दर लागू होतील.